एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट, वेतनवाढीचा फरकही मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

St Employees bonus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २०२०-२१ या दरम्यानची वेतनवाढीचा फरकही वेतनासोबत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

आज (दि.१३ ऑक्टोबर २०२५) रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नवीन सोना, परिवहन विभागाचे प्रमुख सचिव ओमप्रकाश गुप्ता, वित्त विभागाचे प्रमुख सचिव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  Understanding the $1,400 New Year's Day Stimulus, Assistance for Low-Income and Senior Citizens

बैठकीत झालेल्या निर्णयांनुसार, एसटी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट बोनस देण्यात येईल. तसेच २०२०-२4 या वर्षातील वेतनवाढीचा थकबाकी फरकही आता दिला जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स स्वरूपात सन अग्रीम १२ हजार ५०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना योग्य वेळी लाभ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.”

त्याचप्रमाणे, एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे नियोजन सुरू आहे. या अंतर्गत खासगी भागीदारीतून (Public Private Partnership) महामंडळाच्या जमिनींचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

See also  मोठा खुलासा : "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना"त गैरव्यवहार उघड – तब्बल २६.३४ लाख महिलांना अपात्र घोषित! Ladaki Bahin Yojana 2025 

एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अमित मोरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार असून, वेतनवाढीचा प्रश्नही निकाली लागेल.

Leave a Comment