Personal Loan interest rate :- आजकाल वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे अनेकांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहे. घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय आपत्कालीन खर्च किंवा जुने कर्ज फेडणे – अशा अनेक गरजांसाठी लोक पर्सनल लोन घेतात. हे कर्ज कोणतीही हमी (Collateral) न मागता मिळते, त्यामुळे पटकन मंजूर होते.
पण, पर्सनल लोन दिसते तितके सोपे नसते. चुकीने घेतलेले कर्ज मोठ्या अडचणीत टाकू शकते. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या ७ चुका टाळल्यास पर्सनल लोन तुमच्यासाठी उपयोगी ठरेल, ओझे नाही. Personal loan interest rate
१. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे
जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त रक्कम घेणे म्हणजे अनावश्यक हप्ते (EMI) व जादा व्याज भरावे लागणे. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी नीट कॅल्क्युलेशन करा आणि फक्त आवश्यक तितकीच रक्कम घ्या.
२. व्याजदराकडे दुर्लक्ष करणे
घाईगडबडीत किंवा एजंटवर अवलंबून राहून अनेकजण जास्त व्याजदरावर कर्ज घेतात. वेगवेगळ्या बँका किंवा NBFC चे व्याजदर तुलना करणे महत्त्वाचे आहे. १-२% व्याजाचा फरकही दीर्घकाळात हजारो-लाखो रुपयांचे नुकसान किंवा बचत ठरू शकतो. Personal loan interest rate
३. अटी व नियम न वाचता सही करणे
कर्ज करारपत्रामध्ये प्रोसेसिंग फी, प्री-पेमेंट चार्जेस, लेट पेनल्टी यांसारखे अनेक हिडन खर्च असतात. करारपत्र नीट न वाचता सही केल्यास नंतर आर्थिक फटका बसू शकतो. Personal loan rules
४. अनावश्यक खर्चासाठी कर्ज वापरणे
पर्सनल लोन सुट्टी घालवणे, महागडे गॅजेट्स घेणे किंवा लक्झरी शॉपिंगसाठी नाही. हे कर्ज फक्त महत्त्वाच्या आणि उत्पादक गरजांसाठी वापरा
५. हप्ता (EMI) वेळेवर न भरणे
EMI चुकवल्यास दंड (Penalty) भरावा लागतो तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) खराब होतो. सतत हप्ते न भरल्यास बँक कायदेशीर कारवाईही करू शकते. Credit score down
६. नियोजनाशिवाय कर्ज घेणे
कर्ज फेडण्यासाठी स्पष्ट रणनीती नसल्यास कर्ज धोकादायक ठरू शकते. वेळेवर परतफेड कशी करणार हे ठरवूनच कर्ज घ्या. Personal loan return plan
७. क्रेडिट स्कोअरकडे दुर्लक्ष करणे
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कमी व्याजदर आणि चांगले ऑफर्स मिळतात. पण अनेक लोक कर्ज घेण्यापूर्वी आपला स्कोअर तपासत नाहीत. त्यामुळे लोन रिजेक्ट होण्याची किंवा महागड्या व्याजदरावर मंजूर होण्याची शक्यता वाढते. Credit Score