बाप्पा पावला, राज्य कर्मचाऱ्यांना आजच वेतन व निवृत्तीवेतन. Govt Salary Release

बाप्पा पावला, राज्य कर्मचाऱ्यांना आजच वेतन व निवृत्तीवेतन. Govt Salary Release

मुंबई, 26 ऑगस्ट 2025 –Govt Salary Release :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन आज म्हणजेच 26 ऑगस्ट 2025 रोजी अदा करण्यात येणार आहे.

शासनाचा आगाऊ वेतनाचा निर्णय

सामान्यतः वेतन व पेन्शन 1 सप्टेंबर रोजी दिले जातात. मात्र, गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण असल्याने कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना सणासुदीच्या काळात कोणतीही आर्थिक अडचण भासू नये यासाठी शासनाने आगाऊ वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे : Govt Salary Release

  1. ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन 26 ऑगस्ट 2025 रोजी देण्यात येईल.
  2. या निर्णयाचा लाभ सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व संलग्न संस्थांना मिळणार आहे.
  3. कोषागार व लेखा कार्यालयांना आगाऊ वेतन वितरणाची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  4. सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

एस महामंडळ कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार आजच वेतन.

एस टी कर्मचाऱ्यांनाही गणेश उत्सवाच्या सुरुवातीला वेतन अदा करण्यात येणार आहे आज 26 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना 75% पगार त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल, याचा लाभ 80 हजार कर्मचाऱ्यांना मिळेल, सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर वेतन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना सनासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे. Govt Salary Release

लाखो कुटुंबांना दिलासा.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार असून, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना आनंदात सण साजरा करता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने आगाऊ वेतन देत परंपरा कायम ठेवली आहे. Govt Salary Release

Leave a Comment