या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचार मिळणार, आदिती तटकरेंच्या हस्ते उदघाटन. Free treatment for Women

Created by Ranjan 25 ऑगस्ट 2025  –  Free treatment for Women :  पनवेलमधील करंजाडे येथे ‘आदिती लाईफ केअर’ रुग्णालयाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्यक्रमात बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या, “करंजाडे परिसरात आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे हे मोठे रुग्णालय सुरू झाले आहे. विशेषतः महिलांना मोफत उपचार मिळतील. त्यामुळे महागड्या खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज राहणार नाही.”

महापालिकेत ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटिस, वेळेवर न आल्याचा फटका. Municipal employees punctuality

या रुग्णालयाच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सचिव अक्षय देवकर यांनी पुढाकार घेतला. परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. Free treatment for women

पनवेल व उरण मतदारसंघात या रुग्णालयासोबत अनेक विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महिलांसाठी मोफत उपचार देणारे हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार आहे. Free treatment for women

 

 

Leave a Comment