खुशखबर गणेशोत्सवानिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तीवेतन आगाऊ रक्कम. Govt Salary Release

खुशखबर गणेशोत्सवानिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तीवेतन आगाऊ रक्कम. Govt Salary Release.

मुंबई | 21 ऑगस्ट 2025

Govt Salary Release :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन १ सप्टेंबर 2025 ऐवजी २६ ऑगस्ट 2025 रोजी आगाऊ देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण असून, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक यांना या दिवशी सण साजरा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: Govt Salary Release

1. ऑगस्ट 2025 महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी अदा करण्यात येईल.

See also  एसटी प्रवासात आता पुरुषांनाही १०–१५% छुट मिळणार.  Msrtc news Today 

2. या निर्णयामध्ये सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्न संस्था यांचा समावेश आहे.

3. संबंधित कोषागार कार्यालयांनी व लेखा कार्यालयांनी वेतन व निवृत्तीवेतन आगाऊ देण्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4. सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांसाठी दिलासा. Govt Salary Release

गणेशोत्सवाच्या दिवसांत शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक सोय उपलब्ध व्हावी, याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही वेतन व पेन्शन आगाऊ दिले जात आहे. यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment