गणेशोत्सवानिमित्त राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार का? प्रश्न अनुत्तरीत. Ganesh Festival 2025.
मुंबई : Ganesh Festival 2025 : नमस्कार मित्रानो दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरपूर्वी मिळणार का?
शिंदे सरकारच्या कार्यकाळात मागील वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उत्सव काळात खरेदीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नसे.
कोकणातील विशेष महत्त्व. Ganesh Festival 2025
कोकण भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही शाळांना दिवाळी सुट्टी कमी करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसांची सुट्टी दिली जाते. प्रशासनाकडूनही स्थानिक सुट्ट्यांची तरतूद केली जाते.
वेतनाबाबत अद्याप निर्णय नाही. Ganesh Festival 2025
साधारणपणे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे सप्टेंबर महिन्यात अदा केले जाते. मात्र यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत असल्याने वेतन आगाऊ मिळणार का याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही.
मंत्रीमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष.
गणेशोत्सवाचे महत्व लक्षात घेता पुढील मंत्रीमंडळ बैठकीत आगाऊ वेतन देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासाठी कोकणातील काही संघटनांनी शासनाकडे निवेदनही सादर केले आहे.