महाराष्ट्रात पावसाची भयाण परिस्थिती — हाहाकार, 8 जिल्ह्याना रेड अलर्ट जारी , सरकारी कार्यालये, शाळा बंद. Maharashtra Rain Update 2025
Maharashtra Rain Update 2025 : महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले आहे. विशेषकरून मुंबई आणि त्याचे उपनगरीय भाग अतिवृष्टीमुळे पूर्णपणे जलমय झाले आहेत; सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. उर्वरित राज्यातील अनेक जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
Har Ghar Tiranga प्रमाणपत्र डाउनलोड करा आणि ठेवा आपल्या स्टेटस ला ! असे करा डाउनलोड.
अतिवृष्टीमुळे आणि पुरासारख्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबई महापालिकेनेही महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाचं महत्त्वाचं आवाहन — “गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा” — नागरिकांनी अतिशय सावधगिरीने वागावे.
अतिवृष्टीमुळे प्रभावित जिल्हे आणि तपशीलवार घटना. Maharashtra Rain Update 2025
मुंबई, ठाणे, रायगड व नाशिक
हवामान विभागाने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत हल्लीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे शिक्षणसंस्था, कार्यालयं व वाहतूक व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
मराठवाडा व विदर्भ
इथल्या अनेक भागातही अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात कल्लन पावसामुळे २०६ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत ७ जनांचे मृत्यू झाले आहेत. मुखेड तालुक्यात ढगफुटीमुळे लेंडी धरणाचा पाणीसतत मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून येणाऱ्या पूरामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ या भागांचे जनजीवन खंडित झाले आहे. रावनगावमध्ये २२५ नागरिक पुरात अडकले होते, त्यापैकी अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, काही नागरिक अजून बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM) ट्विटद्वारे या भागातील बचावकार्य, प्रशासनाची हालचाल आणि एनडीआरएफ, सैन्य व पोलिसांची मदत याबद्दल माहिती दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकण. Maharashtra Rain Update 2025
सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, कराड या भागात, आणि कोकणातील सावंतवाडे व रत्नागिरी येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. कोयना धरणातून ३३००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Har Ghar Tiranga प्रमाणपत्र डाउनलोड करा आणि ठेवा आपल्या स्टेटस ला ! असे करा डाउनलोड.