जुलै 2025 मध्ये लॉन्च होणारे दमदार स्मार्टफोन्स: Nothing Phone 3 पासून Galaxy Z Fold 7 पर्यंत!

जुलै 2025 मध्ये लॉन्च होणारे दमदार स्मार्टफोन्स: Nothing Phone 3 पासून Galaxy Z Fold 7 पर्यंत! SMARTPHONES LAUNCHING IN JULY 2025 

प्रतिनिधी | 2 जुलै 2025 | मुंबई:

SMARTPHONES LAUNCHING IN JULY 2025  : जुलै 2025 तंत्रज्ञानप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे, कारण या महिन्यात अनेक कंपन्या त्यांच्या नवीन स्मार्टफोन्सचे दमदार मॉडेल्स लॉन्च करणार आहेत. Nothing, OnePlus, Samsung यांसारख्या दिग्गज ब्रँड्सकडून फ्लॅगशिप आणि मिड-रेंज सेगमेंटमधील आकर्षक फोन बाजारात दाखल होणार आहेत.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या फोनकडे लक्ष द्या — हे फोन जुलैमध्ये धूम करणार आहेत.

📱 1. Nothing Phone (3) – स्टायलिश डिझाईन आणि स्मार्ट परफॉर्मन्स.

Carl Pei यांच्या Nothing कंपनीकडून येणारा Nothing Phone (3) 2025 च्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एक मोठा गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

लाँच डेट: जुलै पहिल्या आठवड्यात अपेक्षित

  1. अपेक्षित वैशिष्ट्ये: Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, नवीन Glyph interface, AI-आधारित फिचर्स.
  2. ऑपरेटिंग सिस्टम: Nothing OS 3.0 (Android 15 बेस्ड)
  3. SMARTPHONES LAUNCHING IN JULY 2025  :
  4. 📱 2. OnePlus Nord 5 – मिड-रेंज किंगची पुनरागमन

OnePlus Nord 5 हा फोन भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये जबरदस्त हिट होण्याची शक्यता आहे. परवडणाऱ्या किमतीत उत्तम स्पेसिफिकेशन्स ही या Nord सिरीजची खासियत राहिली आहे.

अपेक्षित लाँच: जुलै दुसऱ्या आठवड्यात

  • प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7+ Gen 3.
  • कॅमेरा: Sony IMX882 मुख्य सेन्सर.
  • बॅटरी: 5000mAh + 100W SuperVOOC चार्जिंग

📱 3. OnePlus Nord CE 5 – बजेट फ्रेंडली वनप्लस फोन

OnePlus चा “Core Edition” म्हणजेच CE 5 हा फोन मुख्यतः बजेट युजर्ससाठी आणला जात आहे. कमी किंमतीत उत्तम परफॉर्मन्स हे याचे वैशिष्ट्य आहे.

अपेक्षित वैशिष्ट्ये: Snapdragon 6 Gen 1, 120Hz AMOLED डिस्प्ले

डिझाईन: स्लिम आणि प्रीमियम

लाँच डेट: जुलै 2025 शेवटचा आठवडा

📱 4. Samsung Galaxy Z Fold 7 – फोल्डेबल फोन्समध्ये नवे पर्व

Samsung चा नविन Galaxy Z Fold 7 हा फोल्डेबल फोन बाजारात परत एकदा क्रांती घडवण्यास सज्ज आहे. प्रीमियम सेगमेंटमधील ग्राहकांसाठी हा फोन आकर्षक ठरणार आहे.

अपेक्षित वैशिष्ट्ये: Snapdragon 8 Gen 3, इनहॅन्स्ड फोल्डिंग हिंग, IP रेटिंग

स्क्रीन: इनर आणि आउटर दोन्ही AMOLED

Galaxy AI फिचर्सचा समावेश

📱 5. Samsung Galaxy Z Flip 7 – स्टायलिश फोल्डिंग फोन

जर तुम्हाला फोल्डिंग तंत्रज्ञान आणि कॉम्पॅक्ट डिझाईन हवे असेल, तर Galaxy Z Flip 7 हा एक उत्तम पर्याय आहे. Flip फोन्सला पसंती देणाऱ्यांसाठी Samsung ही सर्वोत्तम निवड राहिली आहे.

  1. कॅमेरा: ड्युअल सेटअप, OIS सपोर्ट.
  2. डिझाईन: पेबल स्टाईल, टिकाऊ फोल्ड मिकॅनिझम.
  3. Galaxy AI इंटिग्रेशन: स्मार्ट फोटो एडिटिंग, ट्रान्सलेशन फीचर्स

 

Leave a Comment